पुण्यात कंबरेलापिस्टल घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी अटक


पुणे:पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सोमवारी खडक पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनला हजर असतांना, पोलीस अंमलदार सागर केकाण व फईम सैय्यद यांना खबर मिळाली की, खडक पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेज इक्बाल पटवेकर हयाचे कंबरेला एक पिस्टल असुन तो छोटी मशिद शेजारील उसमानी रेस्टॉरन्ट गंज पेठ येथे बसलेला आहे.ही खबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट खडक यांना तातडीने कळवण्यात आली. त्यांनी योग्य ती काळजी कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अंमलदार घटनास्थळी गेले तेथे रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेज पटवेकर हा पोलीसांना दिसुन आला. त्यास झडप घालुन पकडण्यात आले. ्याची अंगझडती घेता त्याचे कंबरेस मागील बाजुस 30 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व दोन हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुसे मिळुन आली. त्याचेवर खडक पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशिल वि बोबडे हे करीत आहेत. पटवेकरवर खुन, खंडणी, घातक शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.पिस्टल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारा खडक पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून पिस्टलसह दोन जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. परवेज इक्बाल पटवेकर (23 रा. गुरुवार पेठ, बोंबीलवाडा) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे