स्पा सेंटर चालवण्यासाठी खंडणी तिघांना अटक

पुणे : . १६ जानेवारी ला कोरेगाव पार्क मध्ये रोजी स्पामध्ये दोघे जण आले व त्यांनी स्काइन स्पा चालू ठेवायचा असेल तर दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल मंगेश डोंगरखोस (वय ३१, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा) यांनी काेरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली..
मंगेश हे कोरेगाव पार्कमधील स्काइन स्पा सेंटर येथे मॅनेजर म्हणून काम पाहतात. स्पा सेंटरच्या मालकीन नुतन धवन (रा. केशवनगर, मुंढवा) आहे.
(1) विशाल कचरु पायाळ (वय २८, रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर), (2 ) सनी तानाजी ताकपेरे (वय २७, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
विशाल पायाळ हा पोलीस प्रवाह न्युजचा पत्रकार असल्याचे सांगत आहे त्यांचा साथीदार पंकेश राजू जाधव (वय 35 रा. कोंढवा खुर्द) यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी
. तेव्हा धवन यांनी त्याला नकार दिला. त्याने माझे परवानगीशिवाय स्पा चालू ठेवता येणार नाही. तुम्हाला दरमहा १५ हजार रुपये द्यावेच लागतील. अन्यथा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. दंडुकीधारी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी दिली.
सोमवारी त्याने फोन करुन आज दुपारी पैसे घेण्यासाठी येतो, असे सांगितले. या प्रकाराची त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी तातडीने इतर अधिकारी, पंचांना बोलावून स्काइन स्पा येथे सापळा रचला. विशाल पायाळ व सनी ताकपेरे तेथे आले. मंगेश यांच्याकडून १५ हजार रुपयांचा हप्ता घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
तुम्हाला स्पा सेंटर चालवायचे असेल तर आम्हाला दरमहा १५ हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. नाही तर दंडुकीधारी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी सापळा लावून अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक आयुक्त चंद्रकांत सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, रुपेश चाळके, दिनेश शिंदे, अमोल सोनावणे, राजेश पवार, निशिकांत सावंत, संदीप गर्जे, गणेश गायकवाड, तुकाराम शिंदे, सचिन वाघमोरे, प्रकाश लंगे यांच्या पथकाने केली आहे…