पुण्यात 2022 ला काय होणार…

पुणे ( प्रतिनिधी ) आपला पक्ष शहरात सरस कसा, हे नागरिकांवर बिंबवण्याची जबाबदारी अनेकांवर टाकण्यात आली आहे. पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे परिसरात कार्यकर्त्यांमध्ये 2022 ला काय होणार? याबाबतची चर्चा रंग घेवू लागली आहे. इच्छुक उमेदवारांनीही प्रभागात मतांची बांधाबांधी सुरू केली आहे.

प्रभाग करण्यासह, वार्ड कसे पाडण्यात येतील? परिसर कसे विभागले जातील? याबाबतची राजकीय कुजबुज सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांची कामे होण्यासाठी कितीचा प्रभाग असावा, लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा काय, याबाबत लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार व नागरिकांची मते प्रभातने जाणून घेतली. महानगरपालिका निवडणुकीला अवघे एक वर्ष कालावधी राहिला आहे. यामुळे प्रमुख राजकीय पक्षांकडून आराखडे आखले जावू लागले आहेत.

प्रभाग चारचा असेल तर नागरिकांची कामे होण्यास चांगला स्कोप मिळतो. मात्र, नगरसेवकाचे काम चांगले असेल जनसंपर्क असेल आणि काम करण्याची मानसिकता असेल तर कितीचाही प्रभाग पडला तरी काहीच फरक पडणार नाही, हे नक्की. नागरिकांची कामे होणे, त्यांच्या समस्या सोडविणे महत्वाचे आहे. त्यामुळे प्रभाग कितीचाही पडला तरी नागरिकांची कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधीला काही अडचण येणार नाही. नागरिकांच्या समस्यां सुटणे गरजेचे आहे. आमची हिच भूमिका कायम राहिलेली आहे. प्रभाग एकचा लोकहिताचा राहील. नगरसेवकाने सामाजिक बांधिलकी जपत विचारांची जडणघडण केली पाहिजे. एक सदस्यीय वार्ड असल्यास मुलभुत गरजांच्या विकास कामांवर ताण येणार नाही. नागरिकांना विपरीत परिणामांच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.


Latest News