पुण्यातील निर्बंधाबवर लवकरच निर्णय- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : शाळा आणि महाविद्यालयं सुरू झाल्यामुळे येथे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं या संस्थांनी म्हटलंय. तसे निष्कर्ष आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटने काढले आहेत. या निष्कर्षानंतर आता येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील निर्बंधांबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाची धावपळ उडत आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरु केल्यामुळे कोरोना रुग्ण वाढल्याचे समोर आल्यानंतर आता शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तसेच, येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुण्यातील निर्बंधाबवर निर्णय घेण्यात येणार आहे.आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या संस्थांनी कोरोना रुग्ण वाढण्याचे कारण शोधण्यासाठी सर्वे केला. यामध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरु झाल्यामुळे पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं या संस्थांनी म्हटलं. तसा पाहणी अहवाल या संस्थांनी विभागीय आयुक्तांना दिला. या अहवालाचे सादरिकरण  विभागीय आयुक्तांसमोर करण्यात आले. त्यानंतर आता याच संस्थांना आणखी एक सूचना अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यात पुन्हा लॉकडाऊन लागू नये तसेच कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत?, यावर सूचाना देण्याचे या संस्थांना सांगण्यात आले आहे. राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पुण्यात हे प्रमाण लक्षणीय आहे. आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या संस्थांनी पुण्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.