पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आय.टु.आर अंतर्गत इमारतबांधणे व कामाचा भूमिपूजन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न

पिंपरी ( प्रतिनिधी ) दिघी बोपखेल मधील पुणे आळंदी रोड वरील सैनिक भवन जवळ, आय.टु.आर अंतर्गत बहुउद्देशीय इमारतबांधणे व जागा विकसित करण्याच्या कामाचा भुमिपुजन समारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील दिघी बोपखेल मधील पुणे आळंदी रोड वरील सैनिक भवन जवळ, आय.टु.आर अंतर्गत बहुउद्देशीय इमारत बांधणे व जागा विकसित करण्याच्या कामाचा भुमिपुजन समारंभ आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार महेश लांडगे यांचे हस्ते संपन्न झाला, यावेळी  प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, कुंदन गायकवाड, नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी नगरसदस्य दत्तात्रय गायकवाड, रामदास कुंभार, मीना पाटील, आशा सुपे, आदी उपस्थित होते.