आठडाभरात MPSC परीक्षा निश्चित होईल: मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : .अगदी चार दिवस राहिलेले असताना परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली. त्याचं पर्यवसन उद्रेकात झालं. शेकडो विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरले. MPSC अभ्यासिकेतील 2 हजार मुलं रास्तारोकोत सहभागी झाल्याचा अंदाज आहे. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आयोगाचा निषेध व्यक्त केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना MPSC च्या निर्णयाबद्दलम मोठी घोषणा केली. येत्या 14 मार्चला होणारी राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने जाहीर होताच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलं होतं. त्यांना आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, पुढच्या आठडाभरात परीक्षा निश्चित होईल.त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, रस्त्यावर उतरू नये सरकार विद्यार्थ्याच्या भावानांशी सहमत आहे,’ असं सांगितलं होतं
. परीक्षा यंत्रणा खूप मोठी आहे. कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट झाल्याने परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी वेळ लागत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग परीक्षेदरम्यान होऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
लस घेतलेलेच कर्मचारी परीक्षेसाठी देण्याची सूचना मी केली आहे, असंही ते म्हणाले. यंत्रणेतल्या सर्वांची कोरोना चाचणी होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.यावर्षी मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचंकारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या दीड वर्षांत पाचव्यांदा परीक्षा रद्द झाल्याने किंवा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली होती
.
राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रक आयोगाने काढलं होतं. दुपारी आयोगाचं निवेदन आल्यानंतर संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांचा असंतोष धुमसत राहिला. जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलू नका, असं आवाहन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना आदेश विद्यार्थ्यांचे प्रश्नं संवेदनशिलतेने हाताळा. राज्याची कायदा सूव्यवस्था बिघडू देऊ नका