“देवेंद्रजी,आज मी निशब्द झालोय..

” आजचा सभागृहातील आपला बाणेदारपणा पाहिला.. पण थोडी खोलात जावुन चौकशी केल्यावर समजलं की अंबानीच्या घरापुढे स्फोटक सापडलेल्या व नंतरच्या गाडीमालकाच्या निधनाच्या विषयावर आपण ही आक्रमकता दाखवलीय..आपण महाराष्ट्र पोलिसांवर देखील जोरात चिखलफेक केली.. वा देवेंद्रजी वा.. किती ही मालकांप्रती निष्ठा.. पण देवेंद्रजी मला एक समजत नाही हिच तत्परता आपण मंत्रालयाच्या तुमच्या दालनासमोर विष प्राशन करून जिवन संपवलेल्या धर्मा पाटलांना न्याय देण्याच्या बाबतीत का हो दाखवली नाही.. उलट मुख्यमंत्री असतेवेळी तुमचा दौरा धुळे जिल्ह्य़ात होता तेव्हा याच धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना तुम्ही नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते

बिचारे शेतकरी रामेश्वर भुसारे मंत्रालयात न्याय मागण्यासाठी येतात तेव्हा त्यांना मंत्रालयात मारहाण होते तेव्हा कुठे जातो तुमचा कणखर बाणा.. अन्वय नाईकची केस पाच वर्षे जैसे थे ठेवलीत आणि बिचार्‍या नाईक कुटुंबीयांवर अश्रु ढाळण्याची वेळ आणलीत तेव्हा तुमचा स्वाभिमान जागृत का झाला नाही देवेंद्रजी.. हीच तत्परता तुम्ही कोपर्डीतील नराधमांना शिक्षा देण्याबाबतील का दाखवली नाहीत.. हीच तत्परता छत्रपतींबाबत बोललेल्या छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्यात का दाखवली नाही.. हीच तत्परता सरसकट कर्जमाफी करताना का हो नाही दिसली.. हीच तत्परता जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावण्यात का हो नाही दिसली..अशीच आक्रमकता जेव्हा कन्नडगे महाराष्ट्रातील सिमावासियांना त्रास देत होते तेव्हा नाहीत दाखवलीत.. महाराष्ट्राच्या वाट्याचे एकेक महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातील मोठमोठी सरकारी कार्यालये उद्योगकंपन्या गुजरातला पळवल्या जात होत्या तेव्हा नाही दिसला तुमचा हा आक्रस्ताळेपणा.

एका धनदांडग्या गुजराथी उद्योगपती उद्योगपतीसाठी तुम्ही महाराष्ट्राची शान असणार्या महाराष्ट्र पोलिसांचीच बदनामी केली.. महाराष्ट्राच्या रक्षणकर्त्यांचे.. पण आजचा आक्रस्ताळेपणा पाहुन चांगलं वाटलं.. विरोधीपक्षनेता आक्रमकचं हवा त्या शिवाय सरकार तरी कसं कटाक्षाने चालेल.. तुम्ही विरोधीपक्षनेते म्हणुन दिवसेंदिवस महाराष्ट्राचे फेवरेट बनत चालला आहात..

त्यानंतर काय झालं?

फडणवीसांनी काल विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असं भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती.याच सभागृहात ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं.त्यानंतर काय झालं?गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले.याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते. त्यानंतर काय झालं?स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही

.उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं.अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल.(काही भक्तांची भिंत पाहिली तर या आवेशपूर्ण भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल)त्यानंतर काय झालं?हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला.याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँक मध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी करायचे.त्यानंतर काय झालं ?2014 मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेतला, विधानपरिषदेतून आमदार केला आणि आता ते विधानपरिषद मध्ये भाजप चे विरोधीपक्ष नेता आहेत.

इतकंच नाही तर मुख्यमंत्री असतांना मामुनीं शिक्षकांची वेतन बँक खाती मुंबई बँकेत वळवली… नंतर आधी हाय कोर्ट मग सुप्रीम कोर्ट ने फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली.याच सभागृहात कृपाशंकर सिंघ यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल पण अनेक आरोप केले.त्यानंतर काय झालं ?विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकर च्या घोटाळ्याची कागद नाचवली पण स्वता मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाहीये अस प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं

, गृहमंत्री असताना राज्यात वाढलेली गुन्हेगारी असो, विशेषतः नागपूरात. हत्या असोत, आत्महत्या असतो… (विशेषतः गोविंद पानसरे, शेतकरी धर्मा पाटील यांना कोण विसरेल)… अनेक उदाहरण.एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण(?) भाषण केलं त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं (जसे की दादा, तटकरे, कृपाशंकर) त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.२०१४ पूर्वी ठीक होतं पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे.

त्यामुळे दरवेळी प्रत्तेक विषयात फडणवीस मी..मी करत आकांडतांडव करत आहेत ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये. उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतांना दिसत आहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केला.

मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गुस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपने केलेला आकांडतांडव दिसतो

.