महापौर राहुल दादा जाधव स्पोर्ट्स फौंडेशनचा अनोखा उपक्रम…

rahul

मा. महापौर राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त जाधववाडी चिखली मध्ये
हरित अभिष्टचिंतन सप्ताह :- महापौर राहुल दादा जाधव स्पोर्ट्स फौंडेशनचा अनोखा उपक्रम

(चिखली प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मा. महापौर विद्यमान नगरसेवक
राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग क्रमांक ०२ जाधववाडी चिखली मध्ये
हरित सप्ताहाचे आयोजन राहुलदादा जाधव स्पोर्टस फौंडेशन च्या माध्यमातून करण्यातून आले
आहे करोनाच्या वाढता प्रभाव पाहता मा. महापौर राहुल जाधव यांचा या वर्षीचा वाढदिवस
सामाजिक अंतर पाळुन प्रभागातील सर्व डीपी रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करून तसेच
प्रभागातील नागरिकांना विविध प्रकारचे वृक्ष रोपे वाटून साजरा करण्यात येणार आहे जवळ
जवळ ३००० रोपांचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे
राहुल जाधव यांच्या रूपाने सामिविष्ट गावामधील एका कार्यक्षम नगरसेवकास
आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहकार्याने शहराचे प्रथम नागरिक महापौर पद मिळाले
आपले राजकीय दैवत महेशदादा लांडगे यांनी दिलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करताना श्री
राहुल जाधव यांनी सामिविष्ट गावांच्या विकासाचा अनुशेष भरून काढताना चिखली
परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास निधी मंजूर करून आणला .चिखली भागातील अंतर्गत
रस्ते तसेच नवीन डीपी रस्ते मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. काही ठिकाणी कामे
प्रगती पथावर आहेत याच अनुशंघाने सर्व विकिसीत रस्त्यांचे शुशोभीकरण करण्यात येणार
आहे. त्यासाठी विकसित रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे तसेच अंतर्गत नवीन सिमेंट
रस्त्यांचे शुशोभीकरण करण्यासाठी विविध फुलांची रोपे, वेल प्रवर्गातील रोपे नागरिकांना
वाटप करण्यात येणार आहे
यावेळी बोलताना राहुल जाधव यांनी प्रभागातील नागरिकांना
मित्रपरिवाराला, हितचिंतकांना वाढदिवसा निमित्त गर्दी नकरण्याचे आव्हान केले आहे करोना
महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेट टाळून सोशल मीडियाच्या
माध्यमातून शुभेछा रुपी आशीर्वाद देण्याचे आव्हान केले आहे .

Latest News