पुण्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापौरांचा आदेश

पुणे | पुण्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत नसल्याने महापौरांनी नवे आदेश काढले आहेत. काल रात्री ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली.

काय आहेत नवे नियम वाचा-

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काढलेल्या नवीन आदेशाचं पालन नागरिकांनी न केल्यास पुणे हे पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या वाटेवर जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे.

पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आतापर्यंत अनेक निर्बंध लावले तसेच नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहनही केलं. परंतु, तरीहीअशा प्रकारचे नवे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले असून आताच्या घडीला लॉकडाऊनचा विचार नाही पण नागरिकांची साथ कमी पडल्यास लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी एका नागरिकाने लॉकडाऊनबद्दल कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.

1. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सांस्कृतिक, राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमावर पूर्णतः बंदी असणार आहे.

2. महापालिका क्षेत्रातील लग्नसमारंभ हे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी.

3. अंत्यसंस्कार व तत्सम विधी 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी असणार आहे.

4. पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळुन) 50% कर्मचाऱ्यांसह सुरू राहणार. शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय द्यावा