लग्नस्थळाच्या आकारमानानुसार अतिथींची परवानगी द्या’:न्यू पुणे केटरिंग असोसिएशनची मागणी ————————–

सामान्य परिस्थितीत गर्दीच्या हालचालीचे मापदंड प्रति व्यक्ती १० चौरस फूट असते ,कोरोना साठी दरम्यान सुरक्षितता विचारात घेता ही मर्यादा २५ फूट करण्यास आमची हरकत नाही . मात्र ,उपलब्ध जागेनुसार अतिथींची संख्या निश्चित करण्याची मूभा दयावी. त्या नंतर नियमांचे पालन झाले नाही तर शासनाने कारवाई करावी,असे या निवेदनात म्हटले आहे . असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश माळी ,उपाध्यक्ष मनोहर गौड ,जे डी शाहजी ,जी एस बिंद्रा ,सुखदेव सिंग चारण ,मनोज वैष्णव ,कुणाल परदेशी ,दशरथ राजपुरोहित ,कालू महाराज ,अर्जुन सिंग ,विजय मिश्रा ,दिलीप राजपुरोहित ,प्रताप राठोड ,समीर ठाकूर ,संतोष मकुडे ,प्रताप माळी,अण्णा कुदळे यांनी हे निवेदन पाठवले आहे.
विवाहसोहळा हा कोरोना विषाणू प्रसाराचे प्रमुख कारण आहे ,हा गैर समज आहे.मागील २५ दिवसात विवाह सोहळे नसतानाही कोरोना वाढलेला आहे. फक्त ५० जणांची लग्न सोहळ्यात उपस्थिती या कोविड सुरक्षितता विषयक नियमावलीमुळे केटरिंग ,फ्लोरीस्ट,ब्युटिशियन ,इव्हेन्ट मॅनेजर्स,ज्वेलर्स ,बँड्स ,म्युझिक पार्टी ऑर्गनायझर्स ,छायाचित्रकार ,प्रिटिंग प्रेस ,कपडे व्यापारी ,ट्रॅव्हल इंडस्ट्री अडचणीत आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी या उद्योगाला फटका बसला आहे .l..