कोविड सेंटरमध्ये कार्यरत कर्मचारीचं ‘रेमडेसीवीर’ पुरवत असल्याचं तपासातून निष्पन्न


पुणे | कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारीचं ‘रेमडेसीवीर’ पुरवत असल्याचं तपासातून निष्पन्न झालं असून, कुंपणच शेत खातं असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनसह तब्बल 1 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला
असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.राज्यात कोरोनावर गुणकारी असलेल्या ‘रेमडेसीवीर’ औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे बेहाल होत असताना दुसरीकडे कोविड सेंटरमधूनच ‘रेमडेसीवीर’ची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हे उघडकीस आलं आहे.राज्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासतोय. अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावं लागलं
. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्षांमध्ये जुंपली आहे. अशात केंद्र सरकारने पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.