रेमडेसिवीर: महाराष्ट्राला पुरवठा केल्यास परवाना रद्द करू केंद्राची धमकी :.नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई | महाराष्ट्र सरकारने 16 कंपन्यांना रेमडेसिवीर पुरवण्यासाठी विचारलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषध न पुरवण्यास सांगितलं ही गोष्ट धक्कादायक आहे. रेमडेसिवीर कंपन्यांनी  महाराष्ट्रला औषध पुरवठा केल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचं नवाब मलिकांनी सांगितलं

कोरोनाच्या नाजुक परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे

दरम्यान, केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले होते.