जन स्वराज्य सेनेच्या वतीने लातूर येथे पाच दिवसीय भव्य रक्तदान शिबिर आयोजन.

FB_IMG_1609477500936

जन स्वराज्य सेनेच्या वतीने लातूर येथे पाच दिवसीय भव्य रक्तदान शिबिर आयोजन.

लातूर प्रतिनिधी ( संतोष टाक) . वाढत्या कोरून संक्रमणामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे करुणा मुळे अनेक रुग्णांचे होत असलेली हाल त्याचबरोबर त्यांना अपुरी पडणारी वैद्यकीय सुविधा अशा बाबी लक्षात घेऊन जनस्वराज्य सेनेनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन लातूर येथील शासकीय हॉस्पिटल च्या प्रांगणात दि 5.5 2021 ते 10.05 .2021 असे पाच दिवसीय आयोजन केले

रक्तदान शिबिराचे उद्घाटन लातूरचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या हस्तेतर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार धीरज भैया देशमुख व इतर मान्यवर राहणार आहेत. महाराष्ट्रामध्ये पडणारा अपुरा रक्तपुरवठा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना पुरवला जाईल तरी आपले रक्तदान एखाद्या ची जीव वाचू शकते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आव्हान आयोजक उपराज्यप्रमुख संतोष टाक, राज्य संघटक विनोद भाऊ जाधव मराठवाडा प्रमुख अनिल राठोड मराठवाडा उपप्रमुख साईनाथ शहाणे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी कलशेट्टी तसेच इतर जन स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे

Latest News