आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला देणार होतो का? चंद्रकांत पाटिल


पुणे |….मुंबई पोलिसांनी ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतल्याचं कळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर नेत्यांवर निशाणा साधला होता. याला चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे
. आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं?, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. लोकांना मदत करणं चुकीचं आहे का? रोहित पवारही मदत करत आहेत. ते योग्यच आहे. तुम्हीही मदत करा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. लोकांना मदत केलीच पाहिजे. भाजपचे लोक घरदार विकून लोकांना मदत करत आहे. करू द्या ना, तुम्हीही करा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
सरकारची यंत्रणा कुठे आहे? मला आता काही हॉस्पिटलचा फोन आला. अजूनही लस आली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लसीकरणाचा खोटा प्रचार सुरुय, तो त्यांच्या लक्षात आलाय. जसा जसा साठा येईल तसा पुरवठा केला जाईल. पुण्यात 6 लाख लसीकरण झालं, असंही त्यांनी सांगितलं.