पुणे वाहतूक पोलिसांचे कॅशलेस च्या दिशेने वाटचाल पोलिसांच्या लाचखोरीला आळा,

PicsArt_06-04-09.02.11

पुणे : वाहतूक नियमांचं किंवा संचारबंदीचं उल्लंघन केल्यास नागरिकांची पोलिस अडवणूक करतात. तसेच रोख रक्कम वसूल केली जाते. या लाचखोरीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आता कॅशलेस होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहेत.गुगल पे’ द्वारे दंडाची रक्कम भरण्याची सुविधा पुणे पोलिस उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीला आळा बसणार आहे.

वाहनांची तपासणी केल्यानंतरचं त्यांना पुढे जाऊ दिलं जातं. या ठिकाणी पोलिस अडवणूक करतात. महत्त्वाचं काम असलं जाऊ देत नाहीत. नागरिकांना जबरदस्तीने 500 रुपयांची पावती करायला सांगतात.पैसे नाहीत असं सांगितल्यास, पोलिस मित्राच्या अकाऊंटवर गुगल पे करायला सांगतात. यातून नागरिकांची मोठी लूट केली जाते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी अकारण अगदी छोट्या कारणांसाठी पावत्या फाडतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कॅशलेस होण्याचा निर्णय घेतला आहे.

Latest News