भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ- एकनाथ खडसे

Backup_of_ps-final-edit-a

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पडणार का यासह इतर विषयावर भाष्य केले. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत.  त्यांची तळमळदिसून येत आहे, त्यामुळे जर त्यांना कोणताही पक्षाने साथ दिली ते सरकार स्थापन करायला तयार होतील’, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे  नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला.

‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत. त्या कारणामुळे मी सत्तेत आलं पाहिजे, यासाठी त्यांनी अजित पवारांसोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. पण, दुर्दैवाने सत्ता काही टिकली नाही. पण आजही त्यांची तळमळ दिसतेय. त्यामुळे सरकार स्थापन करायलाअसा  प्रसंग आला तर कोणताही पक्षाला सोबत घेऊन ते तयार होतील’ असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला.

तसंच, ‘महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. सरकार भक्कम आहे, त्यामुळे सत्ता न आल्यामुळे भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ काढला जात आहे, भाजपमध्ये अनेक नाराजांची संख्या वाढू नये म्हणून भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे, असंही खडसे म्हणाले.

तसंच, ‘महाविकास आघाडी सरकार आल्यापासून चंद्रकांत पाटील सांगतात सरकार पडणार,  फडणवीस म्हणाले सरकार पडणार, भाजपचे उरलेले अनेक नेते वेगवेगळा मुहूर्त सांगत आहे, पण सरकार पडत नाही. दिवसेंदिवस सरकार आणखी मजबूत होत आहे’, असा टोलाही खडसेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

Latest News