कोरोनामुळे अनाथ मुलांसाठी पुणे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय…

PicsArt_06-17-09.45.56

पुणे | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क राहील, असा निर्णय पुणे प्रशासनाकडून घेण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील 26 बालकांनी आपल्या दोन्ही पालकांना गमावलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची माहिती दिलीय.कोरोनामुळे जिल्ह्यातील 26 बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. अशा बालकांचा संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने अशा बालकांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.कोरोनानं देशभरात हैदास घातला आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनानं अनेक हसती खेळती कुटुंब उध्वस्त केली आहेत. अनेकांना अनाथ बनवलं आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनामुळे अनाथ मुलांसाठी पुणे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय.दरम्यान, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत. अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेले अशा बालकांचा सांभाळ योग्य रीतीने होतो किंवा नाही. याबाबत खात्री करून घ्यावी, त्यासाठी गृहभेटी द्याव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

Latest News