पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाना मिळाला


एका परवान्यासाठी दोनशे रुपये शुल्क आहे त्याचबरोबर 15 गुणांची परीक्षाही द्यावी लागत आहे. यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक ला लिंक असणे गरजेचे आहे व पत्त्याचा पुरावा व ओळखपत्र अत्यावश्यक आहे. तर, वयोमर्यादा ही 18 वर्षाची आहे. सर्वात सोप्या पद्धतीने हे लायसन्स उपलब्ध होत आहे. ऑनलाइन नमुना चाचणी सराव देखील यामध्ये देण्यात आलेला आहे.पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यलयातून एकूण 225 जणांनी घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवानाचा लाभ घेतला आहे. यामुळे नागरिकांच्य वाचल्या असून तसेच श्रम,वेळ व पैशाची देखील बचत होणार आहे. राज्यभरात या उपक्रमाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड वेबसाईटवर अपलोड करावे लागत आहे.
आरटीओ कार्यालयाप्रमाणे ऑनलाईन परवान्यांसाठी कुठलेही बंधन राहणार नाही. अपॉइंटमेंटची देखील आवश्यकता नसल्यामुळे नागरिक आपल्या वेळेप्रमाणे कधीही या सेवेचा घरबसल्या लाभ घेऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चांगली सुविधा असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले आहे.
राज्यात दरवर्षी सुमारे 15 लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात. तसंच 20 लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. याकामी नागरिकांचा अंदाजे 100 कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ आणि श्रमही वाचणार आहे. तसंच हे काम करणाऱ्या अंदाजे 200 अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
जनहिताच्या दोन ऑनलाईन सेवांचे लोकार्पण हे या क्षेत्रातील क्रांतीकारी पाऊल असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. आजच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गर्दी टाळून विभागाचे नियमित कामकाज सुरु ठेवण्यासाठीही त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. विभागामार्फत आतापर्यंत जनहिताच्या 85 सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी परब यांनी दिली.