पुणे महानगरपालिका हद्दीतील शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता…सर्व दुकाने बंद

पुणे – अनलाॅकनंतर शनिवार आणि रविवारीही सर्व दुकाने सुरु राहणार की नाही असा अनेक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत अत्यावश्यक सेवा वगळा इतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे
.पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, माॅल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर शनिवार आणि रविवारी पूर्णत: बंद राहतील. तर रेस्टाॅरंट, बार, फूड कोर्टमधून केवळ पार्सल सेवा सुरु राहील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे. पुण्यात आज (दि.18) 280 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे असून 318 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 7 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात एकूण 2658 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.