काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं

मुंबई :: शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन काल पार पडला. यादरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना स्वबळाची भाषा करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. पण याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारणा केली असता उद्धव ठाकरे जे बोलले ते नेमकं कोणाला उद्देशून बोलले हे स्पष्ट झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देऊ, असं मत व्यक्त केलं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाची भाषा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या. काँग्रेसच्या स्वबळावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस असं वाक् युद्ध रंगताना पाहायला मिळत आहे.यासंबंधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग काय तो निर्णय घ्यावा, असं म्हटलं आहे.

त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार का? याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी या विषयावर भाष्य करणं टाळलं, तसेच योग्य वेळ आल्यावर यावर बोलू, असं स्पष्टीकरण दिलं आहे. त्याबरोबरच शिवसेना कोणत्याही लढाईसाठी तयार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

Latest News