ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे- उपमुख्यमंत्री अजित पवार

PicsArt_07-01-07.12.51

पुणे : कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये अजित पवार बोलत होते, ते तिथे खरीप हंगामाच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी बैठकीला मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते

कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवरून राज्यातील राजकारण तापलेलं दिसत आहे. सोलापुरमध्ये संध्याकाळी पडळकरांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली

दुसरीकडे गोपीचंद पडळकरांसह आणि 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यात पक्षाच्या कार्यालयाचं उद्धाटन करताना हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवारांवर आधी गुन्हा दाखल करा. पंढरपुरात जयंत पाटील यांनी मोठी गर्दी जमा केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. पडळकरांच्या हल्ल्यावर पडळकरांनी भाष्य करताना शरद पवांरांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले.

.भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवरून राज्यातील राजकारण तापलेलं दिसत आहे. सोलापुरमध्ये संध्याकाळी पडळकरांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Latest News