कोढव्यात जीम ट्रेनरकडुन महिलेचा विनयभंग,


पुणे : जीम ट्रेनरनेच एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार एनआयबीएम येथे घडला. याप्रकरणी जीम ट्रेनरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश हनुमंत सूर्यवंशी (वय 29, रा. वानवडी) याच्य विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. कोढवा परिसरातील एनव्आयबीएम रस्त्यावरील जी.जे. फिटनेस जीम येथे 25 जूनला रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
फिर्यादी महिला गेल्या दोन महिन्यांपासून या जीममध्ये व्यायामासाठी जात होत्या. आरोपी गणेश तेथे ट्रेनर म्हणून काम करतो. 25 जूनच्या दिवशी व्यायाम केल्यानंतर स्ट्रेचिंग देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेसोबत अश्लील वर्तन केले.त्यामुळे महिलेने पोलिसात धाव घेत, तक्रार दिली.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्बंध घातले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा आणि दुकाने वगळता सर्व आस्थापना दुपारी चारपर्यंतच खुल्या ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही जीम रात्री सव्वाआठ वाजता सुरू होती, या विनयभंगाच्या प्रकरणावरून उघड झाले आहे