23 गावांचा विकासासाठी , मात्र त्यासाठी पुणेकरांनी साथ द्यावी…

ajit-pawar-696x392-696x392-1

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) दोन हजार ९०८ सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने ऑनलाइन सोडत पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि ‘म्हाडा’चे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून या गावांचा योजनाबद्ध विकास केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी पुणेकरांनी साथ द्यावी, अशी हाक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली. या गावांतील काही जागा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या वतीने (म्हाडा) ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत सत्ता काबीज करण्याच्या हेतूने २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावे समाविष्ट करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना पवार म्हणाले, ‘पुणे शहर हे अव्वल स्थानावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार हे कटिबद्ध आहे. समाविष्ट गावांचा योजनाबद्ध विकास करून राज्यातील सर्वोत्तम शहर होण्यासाठी पुणेकरांनी साथ द्यावी.’

‘नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या हद्दीत ‘म्हाडा’कडून काही जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी नागरिकांसाठी स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत’ असे पवार यांनी स्पष्ट केले. ‘राज्यात २०२२पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचा उद्देश आहे. मात्र, करोनामुळे अडचण झाली आहे

Latest News