पिंपरी चिंचवडतील व्यावसायिकाचा मृतदेह कात्रज घाटात…

पुणे : .पिंपरी चिंचवड परिसरातील एका व्यावसायिकाचा कात्रज घाटात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आनंद गुजर (वय 43) असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे पिंपरी-चिंचवड परिसरात व्यवसायिक होता. परंतु मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे ते अडचणीत असल्याची माहिती समोर येत आहे

पिंपरी-चिंचवड- याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कात्रज घाटात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. मयत आनंद गुजर हे पिंपरी-चिंचवड परिसरातील आकुर्डी परिसरातील रहिवासी आहेत

.

. आज सकाळच्या सुमारास या मृतदेहा बाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आनंद गुजर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.