फरार असलेल्या दोघा आरोपींना सहकारनगर पोलिसांनी केली अटक

दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई व पोलीस निरीक्षक युनुस मुलानी पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे करत होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांना खबर मिळाली की मानव ढमाले व वैभव ढमाले हे जेधे चौक स्वारगेट येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार दोन टिम बनवुन सापळा रचुन आरोपींना हत्यारांसह ताब्यात घेण्यात आले. आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पुणे जिल्हयातील भोर तालुक्‍यातील भाटघर धारण परिसरात पसार झाले होते. खूनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्हयात फरार असलेल्या दोघा आरोपींना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. धनकवडी येथे सिगरेट पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात कोयता आणी हॉकी स्टिकने एकाला मारहाण करण्यात आली. आकाश मोहन चौधरी (24, धंदा शिक्षण,रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली होती. त्यांना 6 जूलै रोजी आरोपींनी मारहाण केली होती. याप्रकरणात मानव ढमाले व वैभव ढमाले यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगीरी पोलीस हवालदार बापु खुटवड, पोलीस नाईक प्रकाश मरगजे, संदिप ननवरे, सतिष चव्हाण, भुजंग इंगळे, पोलीस शिपाई महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर यांनी केली आहे.