बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : दहशत निर्माण करण्यासाठी बेकायदेशिररित्या तलवारीसह इतर शस्त्र बाळगणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून दोन तलवारी, दोन कोयते, सुरा असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. संजय रोहिदास फुले (वय 34 रा शिवनेरीनगर कोंढवा खुर्द ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रभाकर कापुरे आणि टीम हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शिवनेरीनगरमधील एका इमारतीत तरूणाने शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे व सुशील धीवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संजयला ताब्यात घेतले
. त्याच्या घरातून दोन तलवारी, दोन कोयते, सुरा असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने, दहशतीसाठी शस्त्रसाठा केल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, सुशील धिवार, मोहन मिसाळ, अभिजीत रत्नपारखी, महेश राठोड यांनी केली.