पिंपरी महापालिकेने पावसाळयाच्या धर्तीवर डेंग्यू मलेरिया रोकण्यासाठी उपाय योजना राबवाव्यात: मारुती भापकर


       


पिंपरी :

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपा नगरसेविका अर्चना बारणे यांचा डेंग्यु मुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे सत्ताधारी भाजपाचे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर शहरातील सामान्य नागरिकांचे जीवन रामभरोसेच झाले आहे .
पिंपरी चिंचवड शहरात विकास कामाच्या नावावर भर पावसाळयातही खोदकामाच्या परवानग्या देण्यात आल्या पावसाळयाच्या धर्तीवर डेंग्यू मलेरिया स्वाईन फल्यू बाबत योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अशा आशयाचे निवेदन आयुक्त राजेश पाटिल यांना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिले आहे

. त्यामुळे भर पावसाळयात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे आपले प्रशासन व पदाधिकारी धृतराष्ट्रीय भुमिका घेऊन अर्थपूर्ण दुर्लक्ष करुन शहरातील नागरिकांच्या जिविताशी खेळत आहे.


पिंपरी चिंचवड शहरात सध्या पावसाळा सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. नाले सफाईचा केवळ फार्स झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्याचे पाणी साचते तसेच काही भागांमध्ये टायर, नारळाच्या करवंट्या जुनी प्लास्टिकची भांडी, कुंड्या आदी टाकाऊ वस्तूं मधून मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे शहरात मोठ्याप्रमाणात डासांचा उपद्रव होत असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे, आदि साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी धुराडे फवारणी ( फॉगिंग ), औषध फवारणी, डबक्यांमध्ये ऑईल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपाय योजना केल्या जात होत्या, त्यावर महापालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करत होती.

दरवर्षीच्या बजेट प्रमाणे यावर्षीच्या बजेटमध्ये देखील कोट्यावधींची आर्थिक तरतूद असताना धुराडे फवारणी ( फॉगिंग ), औषध फवारणी, डबक्यांमध्ये ऑईल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपाय योजना करताना महापालिका दिसत नाही. त्यामुळे पावसाळी वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूचा फैलाव खूप वेगाने शहरात होण्याची शक्यात आहे.

म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व्यापक जनजागृती व योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात व शहरातील सामान्य नागरिकांचे प्राण वाचवावेत. आपण आमच्या या सुचनेची योग्य ती दखल घेऊन त्वरीत कार्यवाही न केल्यास आम्हाला आपल्या विरोधात तिव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक मारुती भापकर यांनी आयुक्ताना दिला

Latest News