पुण्यात मुलीनेच बापाच्या खुनाला वाचा फोडली,

पुणे : पतीने आत्महत्या केल्याचे भासवून आक्रोश केला मात्र मुलीनेच माझ्या बापाचा खून आईने केल्याचं खडक पोलीस स्टेशन मध्ये सांगितल्याने खुणाचा उलगडा झाला
. दरम्यान, राधिकाने पती दिपकला मारल्याचे त्यांच्या मुलीने पाहिले होते. अंत्यसंस्कारावेळी मुलीने आईनेच वडिलांचा खून केल्याचे नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. पुढील तपास खडक पोलिस करत आहेत.
खडक पोलिसांनी पत्नी राधिका दिपक सोनार (वय ३४, रा. गुरुवारपेठ) हिला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक सोनार हा गुरुवार पेठेतील एका जुन्या वाड्यात रखवालदाराचे काम करतो. तो पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह तेथे राहत होता. राधिका एका कपड्याच्या दुकानात काम करते.
दिपक बलवीर सोनार (वय ३६, रा. गुरुवार पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (१२ जुलै) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी,घटनेच्या दिवशी राधिकाने दिपकला जेवायला वाढले. या वेळी दिपकने ते ताट राधिकाच्या अंगावर फेकले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. राधिकाने दिपकला बॅटने मारहाण केली आणि गळा दाबला. त्यात दिपकचा मृत्यू झाला
. मात्र, कोणाला संशय येऊ नये म्हणून राधिकाने दिपकचा मृतदेह बाथरूममध्ये ओढत नेला. तेथे मृतदेह दोरीला लटकवला आणि आत्महत्या केल्याचे भासवले. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नका, असे म्हणून तिने मुलांनादेखील दम दिला.