पंतप्रधान नरेंद्र मोदी मीडिया समोर यायला घाबरतात- प्रणिती शिंदे

सोलापूर: .महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने भाजपला धारेवर धरलं आहे. मोदी सरकारने केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेसने 8 जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु केलं आहे. सोलापूरात देखील महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आलं. मात्र, आंदोलनादरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आज गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मीडिया समोर यायला घाबरतात, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली आहे. तसेच यावेळी मोदींचा प्रतिकात्मक पोषाख घातलेल्या तरुणाच्या गळ्यात उद्योजकांचे फोटो अडकवत आणि नारेबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.दरम्यान, 8 जुलै रोजी नाना पटोले यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये सायकल यात्रा काढून काँग्रेसने दहा दिवसीय आंदोलनाला सुरुवात केली होती

शहरातील सुपर पेट्रोल पंपावर काँग्रेस पक्षाने शुक्रवारी आंदोलन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेणाच्या गोवऱ्या पार्सल पाठवण्यात आल्या. या आंदोलनात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे