चेंबूर, मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत घोषित


मुंबई : मुंबईत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. शहरातल्या विविध भागांत पावसाने रौद्ररुप दाखवलंय. मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे
मुंबईत काल रात्रीपासून पाऊस सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. तसेच त्यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे. जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असं पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत
.
. त्याचप्रमाणे या घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर मोफत उपचार केले जातील, असंही सांगितलंआजही दिवसभर पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले
. त्याचप्रमाणे मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो. हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करण्यात यावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.