PUNE: लोणी काळभोर ,हडपसर, आणि कोथरूड शहरात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना….

पुणे : नातेवाईक असलेल्या मुलाने 15 वर्षीय मुलीवर ती होळीच्या सणानिमित्त गेली असताना तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये तिला आणि तिच्या आईला मारून टाकण्याची धमकी दिल्याचाही प्रकार घडला. दरम्यान पिडीत मुलीची आईने दिलेल्या फि र्यादीवरून अक्षय पुनम राठोड (रा. कुंजीरवाडी, हवेली) यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने मुलीवर सात ते आठ वेळा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेच्या वेळी अल्पवयीन असलेल्या मुलीबरोबर ओळख झाल्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रित झाल्यानंतर तिने लग्नास नकार दिल्यानंतर ही तिच्यावर तिच्या घरात जाऊन अत्याचार करणाऱ्या तेजस दत्तात्रय निकम (20, रा. शनीमंदीराजवळ, गोंधळेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आले आहे. याबाबत पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे.
अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास तिला व तिच्या आईला मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती. दरम्यान, पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हडपसर, लोणी काळभोर आणि कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या असून याप्रकरणात चार वेगवेगळ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
लग्न करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या साहील हाळंदे (रा. सुतारदरा, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 18 वर्षीय पिडीत मुलीने फिर्याद दिली असून ती आठ महिन्याची गर्भवती आहे. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.