हाणामारीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाखाची लाच मागणारा हवालदार ACB च्या जाळयात

पुणे : हाणामारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदाराने एक लाखाची लाच मागितली होती. बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात हा हवालदार कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हवालदाराला एक लाख दहा हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल न करण्यासाठी एका हवालदारानं एक लाखाची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या हवालदारावर कारवाई केली आहे.
दादासाहेब नामदेव ठोंबरे (वय ५०) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे मारहाणीच्या प्रकरणात नाव कमी करून गुन्हा न दाखल करण्यासाठी ठोंबरे याने एक लाख ८० हजार रूपयांची लाच मागितली होती. याबाबत तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती देत तक्रार दाखल केली होती.
तरुणानं दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये ठोंबरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रविवारी बारामती शहर परिसरात सापळा रचून हवालदाराल एक लाख दहा हजार रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.