पुण्यातील महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्याने केली लंपास

पुणे : बसमधील प्रवासी महिलेच्या हातातील ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस कर्वे रस्त्यावरून कोथरूडच्या दिशेला जात असताना ही घटना घडली

.गेल्या काही दिवसांत पीएमपी प्रवासी संख्या वाढल्यामुळे ठरावीक मार्गांवरील बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बस प्रवाशांकडील ऐवज आणि रोख रक्कम चोरण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे या चोरांना अटकाव करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे

या प्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्ता परिसरात राहायला आहेत. त्या गेल्या आठवड्यात कामानिमित्त लक्ष्मी रस्ता परिसरात आल्या होत्या. त्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून कर्वे रस्त्याकडे जाण्यासाठी त्या पीएमपी बसमध्ये बसल्या, तेव्हा बसमध्ये गर्दी होती. त्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरच्या साह्याने कापून नेली. सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत..

Latest News