भारतामधील लोकशाही वाचविण्याच्या लढाईत सहभागी व्हा :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
मुंबई : देशाला 2014 पासून ग्रहण लागलं असून ज्यांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही असे लोक सध्या सत्तेत आहेत. त्यांच्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असून देशाचे चारही स्तंभ धोक्यात आले.लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावं, असंही आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं
असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.दरम्यान, अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी 9 ऑगस्ट 1942 साली ऑगस्ट क्रांती मैदातानूत ‘चले जाव’ चा नारा देत देशभर आंदोलन उभं राहिलं असल्याचं पटोलेंनी सांगितलं.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या लोकांचं योगदान नाही आणि त्या विचारसरणीचे लोक आज सत्तेत बसले आहेत. मोठ्या कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य आणि लोकशाही मोडीत काढण्याचं काम सध्या करत आहेत. लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावं, असंही आवाहन नाना पटोलेंनी केलं आहे
.केंद्र सरकार आणि मोदींवर टीका करत असतात. अशातच ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्त काँग्रसेने स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला. या कार्यक्रमामध्ये बोलताना नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकारवर टीका केली आहे.