पुण्यात ट्रकमधून चोरट्यांनी 3 लाखचा माल केला लंपास…

पुणे : दोन दिवसांपूर्वी फिर्यादी हे कोल्हापूरमधून बेकरीचे पदार्थ घेऊन मार्केट यार्डमध्ये आले होते.  मार्केट यार्डात मालविक्री करून किराणा खरेदी करण्यासाठी थांबलेल्या एका ट्रकमधून चोरट्यांनी ३ लाख ८ हजारांचा ऐवज चोरून नेला.ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहुल चव्हाण (वय ३०, रा. कोल्हापूर ) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संबंधित माल खरेदी विक्री केल्यानंतर, ३ लाख ८ हजारांची रोकड त्यांनी सॅकमध्ये ठेवली आणि ती बॅग त्यांनी ट्रकमध्ये ठेवली. त्यानंतर ते किराणा माल खरेदी करण्यासाठी एका दुकानाजवळ गेले. मात्र, दुकान बंद असल्यामुळे ते त्याठिकाणी थांबले होते. त्यावेळी चोरट्यांनी ट्रकच्या डाव्या बाजूची काच फोडून सॅकमधील ३ लाख ८ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. डी. गिरी तपास करीत आहेत..

Latest News