रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुंड विकी जाधव ला क्राईम ब्रँच युनिट एक कडुन जे्रबंद

रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुंड विकी जाधव ला क्राईम ब्रँच युनिट एक कडुन जे्रबंद

पुणे :  रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगारास ची तपासणी मोहीम क्राईम ब्रँच च्या अधिकारी आणी कर्मचारी यांच्या कडुन चालू असताना युनिट एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे माहिती घेण्याचे काम करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार दत्ता सोनावणे यांना मिळालेल्या माहिती नुसार रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार विकी जाधव हा जांभुळवाडी तलाव, उघडया व्यायाम शाळेजवळ आंबेगाव खुर्द पुणे येथे सार्वजनिक रोडवर थांबलेला आहे त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून ताब्यात घेण्यात आले

लागलीच सदर बातमीच्या ठिकाणी जावुन रेकॉर्डवरील तडीपार नामे विकी जाधव हा दिसल्याने त्यास पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विकी ऊर्फ राहुल बापू जाधव वय २८ वर्षे रा. फ्लॅट नं ४०३ तिसरा मजला कमल कॉप्लेक्स जाधवनगर रायकरमळा धायरी पुणे असे असल्याचे सांगितले त्यास पुणे येथे


मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री अशोक मोराळे, मा. पोलीस उप आयुका गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे यांनी वेळोवेळी पुणे शहरातील पाहिजे आरोपी व शरीराविरुध्द दाखल होणारे गुन्हेतील आरोपी तसेच तडीपार आरोपी चेक करून कारवाई करन्याचे  आदेश दिले होते


  त्यास पुणे येथे येण्यासाठी कोणाची परवानगी घेतली काय? याबाबत विचारणा करता त्याने कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. सदर आरोपीस मा.पोलीस उप आयुक्त परि.३ पुणे यांनी ०२ वर्ष कालावधी करीता पुणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्राचे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्राचे तसेच पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन तडीपार केले होते.
  त्याचे विरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुरनं ५६३/२०२१ मपोका कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर चे अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशना खाली युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे,  अमोल पवार विजयसिंग वसावे, शशीकांत दरेकर, सचिन जाधव, मिना पिंजन, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

Latest News