पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळल्याने सुरक्षित संभोगसाठी पुणे जिल्ह्यातील बेलसर गावात निरोधचे वाटप

पुणे : .पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळत असल्याने गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित संभोग व्हावा यासाठी बेलसर गावात पुरुषांना निरोधचे वाटप करण्यात येत आहे

गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले असून त्यात कोणीही झिका ग्रस्त आढळलेले नाही सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे. सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो असे डॉ. भरत शितोळे यांनी सांगितले.

गावांमध्ये विविध पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून ग्रामपंचायतच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे गावचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी 30 जुलै रोजी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती दिली. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे

. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगागाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे. झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे.

Latest News