झोपडपट्टी भागात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचा केक तलावरीने कापणारे सराईत गुन्हेगार कोयते तलवारीसह जेरबंद गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी
पुणे : वाढदिवसाचा केक कापण्यासाठी कोयते आणि तलवारी वापरून व्हीडीओ काढुन सदरचा व्हीडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करून दहशत निर्माण निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात क्राईम ब्रँच च्या युनिट एक ला यश आले आहे
गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दिनांक ०७ जुलै रोजी लोहियानगर झोपडपट्टी भागात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी कोयते आणि तलवारी वापरल्या होत्या सदरचा व्हीडीओ काढुन दहशत निर्माण करण्यासाठी व्हीडीओ सोशल मिडीयावर टाकल्याची बातमी मिळाली त्यानुसार वाढदिवस साजरा करणारे व त्यात हत्यारे वापरणारे इसमाची माहिती लोहियानगर भागात काढत असताना सदर वाढदिवस हा शाहनवाझ शेख याने केला असल्याची माहिती मिळवली
तसेच त्यामध्ये तिन जणांनी घालक हत्यारांच्या सहाय्याने केक कापल्याचे निष्पन्न झाले . गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी यांनी स्टाफसह लोहियानगर भागात पंचासह जावुन छापा घालुन तिन इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्याची नावे १) शाहनवाझ कासिम शेख वय ३३ वर्षे रा. ५४ डीपी लोहियानगर पुणे. २) मोसीन चौद अत्तार वय ३८ वर्षे रा. ५४ डीपी लोहियानगर पुणे. ३) सर्फराज उर्फ कॅप्टन मिर्झा बेग वय ३० वर्षे रा. ५४ डीपी लोहियानगर पुणे असे असल्याचे सांगीतले. पंचासमक्ष सदर तिनही इसमांकडुन २ कोयले आणि १ तलवार मिळुन आल्याने सदरचा २,०००/- रु किमतीचा माल पंचा समक्ष जप्त करून त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २९९/२०२१ गुन्हा रजिस्टर नंबर ३०० / २०२१ गुन्हा रजिस्टर नंबर ३०१/२०२१ असे आर्म अॅक्ट क ४ (२५) व महा.पो.अधि. क ३७ (१) सह १३५ प्रमाणे वेगवेगळे तिन गुन्हे नोंद करण्यात आला आरोपीस पुढील कारवाई कामी खडक पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदर आरोपींवर यापूर्वी प्रत्येकी १ मारामारीचा गुन्हा खडक पोलीस स्टेशन येथे दाखल आहे सध्याच्या काळात गुन्हेगार आणि तरुणांन मध्ये रात्रीचे वेळी चौका चौका मध्ये गर्दी करुन वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार चालु झाले आहेत
आणि त्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार कोयता सारख्या मोठमोठया बेकायदेशिर हत्याराने कापले जातात त्यावर आळा बसविण्या करिता सदर प्रकाश वर लक्ष ठेवुन गुन्हे शाखा युनिट १ कडुन कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हे शाखा पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त श्री सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश संखे, युनिट १ गुन्हे कडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार इम्रान शेख, तुषार माळवदकर, अशोक माने, सतिश भालेकर, महेश बामगुडे यांनी केली आहे.