भास्कराचार्यांनी शैक्षणिक मानस शास्त्राचा पाया रचला :डॉ सुधाकर आगरकर

..भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी ‘ अंकनाद ‘ अॅपचा पुढाकारपुणे :’उदाहरणे सोडविण्याच्या एकाच पद्धतीचा आग्रह न धरता अनेक पद्धतींना मुभा देऊन भास्कराचार्यांनी गणितात, शिक्षण पद्धतीत स्वातंत्र्य आणि मोकळेपणा आणला,स्वातंत्र्य दिल्यावर दिशा चुकणार नाही यासाठीही ते मार्गदर्शन करीत राहिले.शैक्षणिक मानसशास्त्र जपणारा ,कौतुकाची थाप मारणारा संवाद त्यांनी साधला ,त्यामुळे गणिताची भाषा सोपी झाली.
अध्यापनाच्या दृष्टीने त्यांनी बाराव्या शतकात ज्या सूचना केल्या, त्या आजही उपयुक्त ठरतात’,असे प्रतिपादन गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी केले .’अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्य लिखित ‘ लिलावती ‘ या ग्रंथावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते .
.गणितासारखा रुक्ष विषय भास्कराचार्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला . गणित रंजकरित्या मांडले .गणिताची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली,हे योगदान अभूतपूर्व आहे ‘,असेही आगरकर यांनी सांगीतले . ‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांच्या मासिक वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अकरावे व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले .या सत्रात इष्ट्कर्म ,संक्रमण या संकल्पनांचा आद्य गणिती भास्कराचार्य यांनी लीलावती या आपल्या ग्रंथात घेतलेला वेध समजून सांगण्यात आला . १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या वेबिनार मालिकेचा बारावा भाग सादर झाला. ‘गुणकर्म’ या संकल्पनांचा आद्य गणिती भास्कराचार्य यांनी ‘लीलावती’ या ग्रंथात घेतलेला वेध समजून सांगण्यात आला
. वर्षभर हा उपक्रम चालणार आहे.वेबिनारमध्ये वैशाली लोखंडे यांनी प्रास्ताविक केले . मंदार नामजोशी,समीर बापट,निर्मिती नामजोशी आदी सहभागी झाले . डॉ सुधाकर आगरकर म्हणाले,’भास्कराचार्यांनी गणित सोडवून घेण्याच्या पडताळ्याच्या अभिनव पद्धती निर्माण केल्या. प्रत्येक वेळी उत्तराची खात्री करून घेतली जात होती. गणितासारख्या रुक्ष विषय त्यांनी संस्कृतमधून रंजकरित्या मांडला .’लीलावती ‘ ग्रंथामध्ये गणित उदाहरण घालताना भुंगे ,हत्ती ,वृक्ष ,फुले भेटतात. कोडी घातल्याप्रमाणे भास्कराचार्य गणित सोडवायला सांगत.
गणिताचे नियम सांगणारे श्लोक छोटे असल्याने समजणे सोपेही होते . ‘गणित कोविद’ हा शब्द आपल्याला त्यांच्या लेखनात पाहायला मिळतो . विद्यार्थ्यालाही ज्ञानी समजून हाक मारण्याचे हे उदाहरण दुर्मिळ आहे.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला . भास्कराचार्यांचे ज्ञान भांडार अधिक माहिती करून घेण्यासाठी जिज्ञासूंनी भास्कराचार्यांच्या लीलावती,बीज गणित ग्रंथाची इंग्रजी ,हिंदी,मराठी भाषांतरे वाचली पाहिजेत .
भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने ‘अंक नाद ‘ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली. आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने वेबिनार मालिकेतून उलगडत आहे. आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला,असेही नामजोशी यांनी सांगितले. ……