अरुण पवार यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विविध संस्थांना आर्थिक मदत

अरुण पवार यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विविध संस्थांना आर्थिक मदत पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस अवास्तव खर्च टाळून विविध संस्थांना आर्थिक मदत करीत साधेपणाने साजरा करण्यात आला.
यामध्ये आळंदी येथील 32 विधवा महिला व अंध अपंगांसाठी पेंशन फॉर्म मोफत भरून तहसीदार कार्यालयात जमा केले. सामाजिक कार्यकर्ते विजय वडमारे व राजन गायकवाड यांनी यासाठी सहकार्य केले. याबरोबरच चारशेहून अधिक निराधार महिला व पुरुषांची नोंदणी करून फॉर्म भरून घेतले. याबरोबरच वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून श्री भैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र मंडळ ट्रस्ट या संस्थेला स्वतःची जागा घेण्यासाठी एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेश स्वरूपात करण्यात आली. यावेळी बालाजी पवार, ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, अशिष पवार, कोषाध्यक्ष रवींद्र खुळे, गणेश पवार, सदस्य भीमा घाडगे, अभिषेक पवार, सागर वायकर, मोना पवार यांनी हा धनादेश स्वीकारला.
तर जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट, पुणे संचलित स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाच्या स्नेहछाया निवारा मदत कार्यात सहभागी होत एकवीस हजार रुपयांचा धनादेश जीवनविद्या परिवर्तन ट्रस्टकडे प्रदान करण्यात आला. हा धनादेश ट्रस्टचे दत्तात्रय इंगळे, अनिल पाटील, सोनू पवार अमोल लोंढे,विशाल पवार सहदेव मोरे, जयसिंग पाटील यांनी स्वीकारला.