तालिबानी उत्तरप्रदेशात काही कमी नाही – प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा

अफगानिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणींसमोर दुसरेच मोठे संकट उभे राहिले आहे.यातच तालिबान्यांविरोधात जगभरातून विरोध दर्शविण्यात येत आहे. अनेकांकडून अफगाणी लोकांप्रती चिंता व्यक्त केली जात आहे. तर भारतात मात्र काहींनी तालिबानी लोकांची तुलना थेट हिंदूंशी केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री स्वराने केलेल्या एका पोस्टमध्ये तालिबानची तुलना हिदुत्वाशी केली आहे. असं विधान केले आहे. तिच्या नंतर आता प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांनी तालिबान प्रकरणावरुन वादग्रस्त विधान केल्यानं अनेकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.’भारतातील उत्तरप्रदेशात काही कमी तालिबानी नाही आहेत. तेथे केवळ मुस्लीम नाही तर हिंदू तालिबानीही आहेत. दहशतवादी फक्त मुस्लीम असतो का? तो हिंदूही असू शकतो. महात्मा गांधी साधे होते. तर नथुराम गोडसे तालिबानी होता. ‘ असेही ते म्हणाले आहे.

तालिबानी हे वाईट लोक नसून त्यांच्यावर झालेल्या 20 वर्षांच्या अन्यायाचा हा परिणाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जी अन्यायाची बीजं 20 वर्षं रोवली गेली, त्यातून गोड फळं कशी मिळतील, असा सवाल त्यांनी केला आहे. क्रियेला मिळालेली ती प्रतिक्रिया असून तालिबानवर विश्वास ठेवायला भारताला हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केली वाल्मिकी ऋषींशी तुलना रामायणात वाल्मिकी ऋषींचा इतिहास सर्वांनाच माहित आहे.

वाल्याचा वाल्मिकी झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत तालिबानचंही तसंच होईल, असा दावा मुनव्वर राणा यांनी केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचे पूर्वावर घनिष्ट संबंध असून पुढेही हे संबंध चांगलेच राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे. खरा धोका पाकिस्तानपासून अफगाणिस्तान किंवा तालिबानला काश्मीरमध्ये काहीही रस नसून आपल्याला खरा धोका हा पाकिस्तानपासूनच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तालिबानचे भारताशी काहीही शत्रुत्व असण्याचे कारण नसून त्यांनादेखील भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यातच रस असू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. हे तालिबानचा भारताला मोठा धक्का, घेतला हा मोठा निर्णयमहिलांवर सौदी अरेबियातही अत्याचार महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या मुद्द्यावर शायर राणा यांनी आपली भूमिका मांडली आहे. महिलांवर सौदी अरेबियातही अत्याचार होत असल्याचं सांगत त्यांनी पूर्ण परिसराचा आणि काळाचा विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. भारताने जर अफगाणिस्तानच्या प्रगतीसाठी यापूर्वी पावलं उचलली असतील, तर त्याचा तालिबान्यांकडून आदरच केला जाईल, असंही राणा यांनी म्हटलं आहे.

Latest News