संत मदर टेरेसा यांचा प्रमाणे सेवा करणे गरजेचे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव

1eeae20c-7645-4d74-842a-437b3fc468da

खडकी : : भारतरत्न नोबेल पुरस्कृत संत मदर टेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाला दिले. समाजातील दीनदुबळ्या, कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार करून प्रचंड मोलाचे कार्य केले आहे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवावा असे उद्गार खडकी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांनी काढले.
संत मदर तेरेसा यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने सेंट मेरी चर्च मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी जाधव बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर हिराबाई ऊर्फ नानी घुले, एसव्हीएस हायस्कूलचे चेअरमन फ्रान्सिस डेव्हिड अमित जोशी उपस्थित होते.
संत मदर तेरेसा यांचा जन्म दिन म्हणजेच सेवा दिन साजरा करण्यात आला. मदर तेरेसा यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते कापण्यात आला.
कार्यक्रमामध्ये डेव्हिड यांनी टेरेसा यांचा जीवनपटा बद्दल विस्तृत माहिती दिली. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये अमोल सहारे (पत्रकार दै. पुढारी), आरती मेस्त्री (पत्रकार दै. सकाळ) , संतोष महामुनी, महादेव मासाळ, उमेश पाटील, चंद्रकांत सोनवणे, अस्मिता कांबळे यांना संत मदर टेरेसा सेवा गौरव पुरस्कार २०२१ देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमामध्ये रेव्ह. सुनील राऊत, पास्टर राजू ठाकूर, रेव्ह. पराग लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गोरडे यांनी केले.

Latest News