खेळाडूंनी आपल्या देशासाठी ऑलिम्पिकचे पद येण्यासाठी खूप खूप मेहनत घ्यावी- उपमहापौर सुनिता वाडेकर

3367a6b1-2d1c-48a8-b738-ab0eea174f68

आज सर्व युवकांनी खेळाकडे जास्त प्रमाणात वळले पाहिजे. खेळ खेळत असताना कुठल्या प्रकारचे व्यसन न करता खेळाशी दोस्ती करावी, भारतामध्ये एवढी लोकसंख्या असताना सुद्धा ऑलम्पिक मध्ये आपल्या देशासाठी जास्त प्रमाणात पदक येत नाही, म्हणून खेळाडूंनी आपल्या देशासाठी ऑलिम्पिकचे पद येण्यासाठी खूप खूप मेहनत घ्यावी असे मनोगत पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी व्यक्त केले. कै. उल्हास साठे क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्रीडा गौरव सन्मान देऊन गौरवण्यात येते यावेळी वाडेकर बोलत होते. कार्यक्रमामध्ये आशिष उबाळे (राष्ट्रीय खेळाडू),
सदानंद साबळे (राष्ट्रीय कोच), अमोल सहारे (पत्रकार) यांचा सन्मान वाडेकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमामध्ये उपमहापौर वाडेकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Latest News