महिलांच्या माध्यमातून पोलिस यंत्रणा मध्ये समन्वय साधण्याचं मानिनी फाउंडेशन चं कार्य कौतुकास्पद- पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे


कोल्हापूर येथे मानिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलीस बांधवांना 4000 मास्कचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना बलकवडे यांनी मानिनी फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
पोलीस यंत्रणेने करोना काळामध्ये स्वतःच्या जीवावर उदार होऊन जिल्ह्यातील जनतेची आणि कोरोना रुग्णांची प्राधान्याने जबाबदारी घेऊन सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोना काळामध्ये तातडीने सर्व आरोग्य सुविधा देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
त्यामुळे जिल्हा पोलिस दलातील पोलिस बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवित हानीचं प्रमाण देखील कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्री बलकवडे यांनी केले.
याप्रसंगी अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री… उपस्थित होते. याप्रसंगी कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने पोलीस उपअधीक्षक (ग्रह) श्रीमती पद्मा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा दलातील विविध खात्यांमधील महिला पोलिस अधिकारी आणि मानिनी फाऊंडेशनच्या जिल्ह्यातील समन्वयक आणि पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले
. प्रास्ताविक व मानिनी फाउंडेशनच्या कोल्हापूर अध्यक्षा श्रीमती स्वाती शहा यांनी केले. चर्चासत्रांमध्ये महिला सुरक्षा, महिला पोलिस अधिकार्यांसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबत पोलिस यंत्रणा आणि मानिनी फाउंडेशन यांचेमध्ये समन्वय ठेवून महिलांसाठी कार्य करण्याचे ठरवण्यात आले.
चर्चासत्रामध्ये महिला पोलीस नाईक सुनिता सोनसुळकर, महिला सहाय्यक फौजदार नलिनी लोळगे, महिला पोलीस नाईक रेखा कामत, पोलीस कॉन्स्टेबल दिपाली डावखुरे, रेखा पाटील, अश्विनी पाटील, निर्मला जाधव, विजया सामवेकर, प्राध्यापक डॉक्टर स्मिता गिरी, संगीता साळोखे आदी महिलांनी सहभाग घेतला.
प्रमुख पाहुण्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती पद्मा कदम यांनी महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही तपास कार्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. निर्भया पथक शाळा, महाविद्यालय, एमआयडीसी आणि काही सार्वजनिक आणि सार्वजनिक ठिकाणांवर नियुक्त करून महिलांना सुरक्षितता देत असल्याचे नमूद केले.
अनेक सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी निर्भया पथकाच्या कामगिरीची प्रशंसा केली. यापुढील काळामध्ये मानिनी फाऊंडेशनच्या सहभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणखीन चांगली कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी मानिनी फाऊंडेशन ही महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक अत्याचार आणि स्वयंरोजगार या विषयी देशभर कार्य करणारी अग्रगण्य संस्था असल्याचे सांगितले. महिलांना सामाजिक प्रवाहामध्ये आणून समाज रचनेचा मानवतावादी पाया घालण्याचे काम मानिनी फाउंडेशन करत आहे असे सांगितले.
महिला सक्षमीकरण होण्यासाठी महिलांनी आर्थीक सक्षम होण्याची गरज आहे, असे नमूद करून शहरी आणि ग्रामीण महिलांसाठी मानिनी फाउंडेशन घरगुती उद्योग तसेच शेती उद्योग उभारून, महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देत आहे याबाबतची माहिती दिली. महिलांच्या हाती आर्थिक सत्ता आल्यास त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढूवून कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण निश्चितच कमी करण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी एपीआय फाळके यांनी आभार प्रदर्शन केले.