महाविकास आघाडी सरकारला आरक्षणाचा कायदा कळत नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : महाविकास आघाडी सरकारला आरक्षणाचा कायदा कळत नाही. घटनात्मक तरतूद आणि कायद्याने केलेली तरतूद यातील फरक कळत नाही. त्यांना केवळ पैसा कळतो. जिल्हानिहाय ओबीसींची संख्या ठरवून आरक्षण निश्‍चित करायचे आहे; पण इच्छाशक्‍ती नाही. दिशाभूल करण्याचे काम मात्र ते पद्धतशीरपणे करत आहेत असे मत भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांनी व्यक्त केल

. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न न मिटवताच महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊन दाखवाच, मतदार तुमची वाट लावणार आहेत. आघाडी सरकारमधील तीन पक्ष दिवसभर एकमेकांशी भांडतात आणि सरकार पडायचा मुद्दा आली की तिघे एकमेकांना घट्ट मिठी मारून बसतात, असा उपहासही त्यांनी केला.

ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, ओबीसी आरक्षण विषय काही दिवसांत मार्गी लावता येईल; पण महाविकास आघाडी सरकारला ते करायचे नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली.असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Latest News