देशात झालेला लोकसंख्या विस्फोट हा देशाच्या विकासासाठी अडचण :उपमुख्यमंत्री अजीत पवार

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात. जे आहे ते तडकाफडकी बोलून टाकणे हा दादांचा स्वभाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. याचाच प्रत्यय बारामतीतील एका कार्यक्रमात आला. 50 वर्षापूर्वी शरद पवार साहेब एका आपत्यावर थांबले. मी म्हणत नाही की एका आपत्यावर थांबा पण दोन आपत्यावर थांबा पण पलटन वाढवू नका, असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे

बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. बारामती तालुक्यातील वढाणे गावात रसिकलाल फाऊंडेशनच्या वतीने जनाई उजव्या कालव्यातून वढाणे गावच्या तलाव्यात पाणी सोडण्याच्या लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी आयोजित कार्यक्रमात अजितदादांची फटकेबाजी पाहायला मिळाली

.कुटुंब नियोजन हे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतं. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही एकाच अपत्यावर थांबा, तुम्ही दोन अपत्य होवू देऊ शकता. पण उगाच जास्त नका होवू देऊ, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला आहे. कुटूंब नियोजनावर भाष्य केल्याने आता कुटुंब नियोजनाचा मु्द्दा पुन्हा चर्चेत आला आहे.देशात झालेला लोकसंख्या विस्फोट हा देशाच्या विकासासाठी अडचण ठरत आहे. मर्यादित संसाधन आणि अनियंत्रित लोकसंख्या यांचा मेळ घालणं महत्वाचं बनलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे आपापल्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवत आहेत. त्यासाठी जनजागृती केली जात आहे.

Latest News