म्हाळुंगे मध्ये मुलगा व्हावा म्हणून पत्नीवर अघोरी कृत्य…

पिंपरी : वंशाला दिवा हवा म्हणून गर्भातच अर्भकाचा गळा आवळण्याचा सैतानी कृत्य काही महाभाग करत असतात, किंवा नवजात स्त्री अर्भकाला इतरत्र फेकून देतात, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटना वारंवार घडतच आहे. त्यातच मुलगा (son) व्हावा म्हणून एका पतीने त्याच्या पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा फासून तिचा छळ केल्याची अत्यंत धक्कादायक घटना पिंपरी -चिंचवड शहरात घडली आहे
अघोरी कृत्य करण्यात आल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी पती ऋषिकेश सुदाम बोत्रे , सासू आणि भोंदू बाबा विरोधात चाकण पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केले.
वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा, असा आग्रह होता. त्यामुळे पीडित महिलेचा ते वारंवार अत्याचार करत होते. हे दोघे एका भोंदूबाबाकडे गेले. तिथून त्यांनी अंगारा आणि हळद- कुंकू आणलं. त्यानंतर त्याने सांगितल्या प्रमाणे पीडित महिलेच्या संपूर्ण नग्न शरीरावर लावले. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे पीडित महिला पार हादरून गेली. अखेर या कृत्यामुळे हादरून गेलेल्या महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं
या प्रकरणात आरोपी फरार असून चाकण पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील म्हाळुंगे परिसरात ही घटना समोर आली आहे. ऋषिकेश सुदाम बोत्रे असं या नराधम पतीचे नाव आहे. त्याने आणि त्याच्या आईने हे कृत्य केलंय.
जादूटोणा-करणी सारख्या अघोरी प्रथांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायदा पारित केला आहे. तरी देखिल शहरी आणि ग्रामीण भागात जादूटोणा आणि करणी करण्यासारखे अघोरी प्रकार घडत आहेत.