पुण्यात चित्रपटाप्रमाणे डाव रचत एका सराफाला लुबाडण्याचा डाव फसला…

75 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी वर्मा याने मित्र व्यासला घरी पाठवून 20 लाख रुपये रोख व 30 तोळे सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन ऐवज घेऊन पळ काढला. दरम्यान तक्रार दाखल करतानाही वर्मासोबत व्यास यादव पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी पोलिसांना त्याचा संशय आला होता. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26′ चित्रपटाप्रमाणे डाव रचत एका सराफाला लूबाडण्यात आले. मात्र त्यांना लूबाडणाऱ्या नऊ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी तीतक्‍याच थरारक फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन जेरबंद केले. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमीही झाले. फिर्यादी नंदकिशोर वर्मा(41,रा.दत्तनगर) हे त्यांचा मित्र व मुख्य आरोपी व्यास यादव (34,रा.आंबेगाव खुर्द) याच्यासोबत गप्पा मारत असताना एका इनोव्हा कारमधून पाच व्यक्ती आल्या. त्यांनी वर्माला’ तुम्ही इन्कम टॅक्‍स भरत नाही, बेकायदेशीरपणे सोन्याचा धंदा करता, तुमच्यावर इन्कमटॅक्‍सची रेड आहे’ असे म्हणत गाडीत बसवून दरी पुलाजवळ नेले.

दरम्यान पोलिसांना आरोपींचे लोकेशन कोल्हापूसर येथे असल्याचे समजले. त्यानूसार पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांचे पथक दुचाकी व चारचाकी गाडीवर रवाना झाले. तेथे आरोपी इनोव्हा गाडी घेऊन देवगड-निपाणी रस्त्यावर थांबल्याचे दिसले. पोलिसांची चाहूल लागताच ते इनोव्हा गाडी घेऊन पळून जाऊ लागले. ते थांबण्याचा इशारा करुनही गाडी दामटचत होते. त्यामुळे पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व शिवदत्त गायकवाड इनोव्हा गाडीवर छेप घेऊन लटकले. तर पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांनी इनोव्हा गाडीच्या काचेवर जोरदार प्रहार करुन काच फोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या आरोपींनी गाडी थांबवली. यावेळी भौय्यासाहेब विठ्ठल मोरे, किरण कुमार नायर, मारुती अशोकराव सोळंके, उमेश अरुण ऊबाळे, अशोक जगन्नाथ सावंत व सुहास सुरेश थोरात अशा सहा जणांच्या मुसक्‍या अवळण्यात आल्या. त्यांनी व्याससह इतर पाच साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी लुटलेला मुद्देमाल पुण्यात रोहीत संभाजी पाटील (23,रा.चऱ्होली) याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्यालाही अटख करुन गुन्हयातील माल हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणीक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत व जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.

Latest News