PCMC: समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांना कारणे दाखवा नोटीस …


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील महिला व मुलींना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून करोनाच्या काळात सर्व शाळा, आस्थापना बंद असतानाही शहरातील हजारो महिलांना प्रशिक्षण दिल्याचा दावा करत कोट्यवधी रुपयांची बिले संबंधित संस्थेने उकळली आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती काही नगरसेवकांनी मागविली होती महापालिकेत खळबळ उडाली होती. याची समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांना उपायुक्त अजय चारठाणकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे
. याबाबत ऑगस्ट महिन्यामध्ये समाजविकास अधिकारी बहाद्दरपुरे यांच्याकडे माहिती मागवली होती. मात्र, माहिती देण्यास ते सातत्याने टाळाटाळ करत होते
. तसेच माहिती मागण्यासाठी प्रतिनिधी जाणार असल्याने बहाद्दरपुरे यांनी वरिष्ठांना कल्पना न देता थेट कार्यालयातूनच काढता पाय घेतला होता. वरिष्ठांना पूर्वकल्पना न देता परस्पर बाहेर निघून जाणे व कार्यालयीन कामाकाजाच्या वेळेत फोन बंद करून ठेवल्यामुळे नोटीस देण्यात आली होती. मात्र त्याचाही अद्याप बहाद्दरपुरे यांनी खुलासा केलेला नाही.
वारंवार माहिती लपविणे, तसेच नगरसदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत समाधानकारक माहिती न देणे यावरून उपायुक्त चारठाणकर यांनी पुन्हा बहाद्दरपुरे यांना आज पुन्हा दुसरी नोटीस बजावली आहे. नोटीस दिल्याच्या तारखेपासून कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवसांत समाधानकारक खुलासा करण्यास सांगितले आहे. समाधानकारक खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
माहिती उपलब्ध न करून देण्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यावरून समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांना नोटीस दिली आहे. तीन दिवसांमध्ये त्यांनी याबाबत खुलासा करणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
– अजय चारठाणकर, उपायुक्त, नागरवस्ती विभाग.