आज माझ्यावर टीका करणारे,भविष्यकाळात माझ्या कार्याचे कौतूक करतील,लवकरच दूध का दूध पाणी का पाणी हे सिद्ध होईल:नितीन लांडगे


पिंपरी : विरोधी पक्ष राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांकडून होणाऱ्या टीकेबाबत बोलताना सभापती लांडगे म्हणाले की, “मी माजी आमदार आणि महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांचा मुलगा आहे. आमच्या राजकीय जीवनात चढ-उतार नवे नाहीत. आज जे लोक माझ्यावर टीका करीत आहेत. तेच लोक भविष्यकाळात माझ्या कार्याचे कौतूक करतील.दूध पाणी का पाणी हे सिद्ध होईल असे मत स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले
लाच प्रकरणानंतर चर्चेत आलेले सभापती लांडगे पहिल्याच स्थायी समिती सभेला आत्मविश्वासपूर्ण वावरताना दिसले. भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांमधील विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामांमध्ये येणाऱ्या अडचणीबाबत मार्ग काढण्याबाबत संबंधित विभागाप्रमुखांशी चर्चा केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांना लाच प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पहिल्याच स्थायी समिती सभेला हजेरी लावली
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागातील प्रलंबित कामांना गती दिली पाहिजे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना लांडगे यांनी दिले.
. त्यांनी शहरातील प्रमुख प्रभागतील नगरसेवकांशी सभापती लांडगे यांनी संवाद साधला. स्थायी समितीतील भाजपाचे सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर प्रलंबित विकासकामे आणि स्थायी समितीच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांबाबत संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना सूचना केल्या. पिंपरी-चिंचवड महापालिका सहशहर अभियंता, शहर अभियंता यांच्यासह प्रमुख विभागातील अधिकाऱ्यांकडून सभापती मांडगे यांनी विकासकामांबाबत आढावा घेतला
, रस्ते, पाणी, वीज यासह नागरी आरोग्याशी संबंधित विकासकामे मार्गी लावण्याबाबत वस्तुनिष्ठ चर्चा केली.
माझ्या कृतीतूनच विरोधकांना उत्तर मिळेल. दरम्यान, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महापालिका भवन असा मोर्चा काढून स्थायी समिती बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच, राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य सभेला उपस्थितही राहिले नाहीत. स्थायीचे कामकाज बंद राहील किंवा सभापती लांडगे यांचा पक्षाकडून राजीनामा घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्या सर्व चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे.